“मला अर्जुन हवाय..” मनालीचं सावीला खुलं आव्हान…

कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत आपण पाहतो सावी अर्जुनाचा विश्वास आणि प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करते आहे. आताच कुठे या जोडप्यात गोष्टी व्यवस्थित होणार त्यात मनालीची एन्ट्री झाली आहे. मनाली अर्जुनाची शाळेपासूनची मैत्रीण असते आणि तेव्हा पासूनच तिला अर्जुन आवडत असतो.
आता इतक्या वर्षांनी ती पुन्हा कवठे भैरवगढला परत आली असून अर्जुन आणि तिची अनपेक्षित भेट होते. लहानपणी आवडत असलेला अर्जुन तिला अजूनही आवडतो. अर्जुनला तिच्या जाळ्यात अडकवण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. साधेपणाचा आव आणून अर्जुनला मिळवण्यासाठी ती खेळी खेळते आहे. पण सावीला तिचा हा डाव कळला आहे. “मला अर्जुन हवाय” असं म्हणत तिने सावीला खुलं आवाहन दिलं आहे.
आता सावी या आव्हानाला कशी तोंड देते हे पाहण्यासाठी नक्की बघा, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’, शनिवार, २० जानेवारी, रात्री १० वा . आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर