Serialताज्या घडामोडी

७५ व्या गणतंत्र दिनाच्या निमित्ताने कलाकारांनी शाळेतल्या आठवणींचे पुस्तकं उघडले..

 

२६ जानेवारी २०२४ सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे . भारत देश ७५ वा गणतंत्र दिवस साजरा करत आहे. आपल्या सर्वांच्या ह्या दिवसाच्या खूप आठवणी असतील आणि यात आपले कलाकार ही काही वेगळे नाही. आज प्रजासत्ताक दिवसाच्या निम्मिताने कलाकारांनी त्यांच्या शाळेतल्या आठवणींचं पुस्तकं उघडले.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री ‘तितिक्षा तावडे‘, “२६ जानेवारीला मला आठवतं की आम्ही सर्व विद्यार्थी तयार होऊन शाळेत परेड मध्ये सहभागी व्हायचो. त्यानंतर खेळ आणि कलाकृती सादर व्हायच्या. मी लेझिम मध्ये भाग घ्यायची. मला लेझिम खेळायची प्रचंड आवड होती. माझी प्रत्यक्ष परेड पाहायची खूप इच्छा आहे. मला अभिमान आहे ह्या २६ जानेवारीला आपण आपल्या प्रजासत्ताक दिनाचं ७५ व वर्ष आपण साजरा करत आहोत.


‘शिवा’ च्या वेगळ्या लूकने चर्चेत असलेली ‘पूर्वा कौशिक’, “सगळ्यात पहिले सर्वाना ७५ व्या गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा. माझी २६ जानेवारीची आठवण म्हणजे सकाळी ७ वाजता तयार होऊन शाळेत पोहचायचं परेड आणि लेझीम मध्ये सामील व्हायचं. मी खूप नशीबवान आहे मला दरवर्षी शाळेत ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला मिळायचं. माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ही मी शाळेत गणतंत्र दिवसासाठी जायची आणि मनापासून भारताच्या तिरंग्याला सलामी द्यायची. आपलं संविधान हे जगातल सगळ्यात मोठं संविधान आहे. आपण बघतोच की विविध जाती आणि परंपरेनि नटलेला हा आपला भारत देश आहे. म्हणूनच मला वाटतं की ह्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने भारताचा सुजाण नागरिक म्हणून स्वतःची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.


‘सारं काही तिच्यासाठी’ मधील लाडकी उमा म्हणजेच ‘खुशबू तावडे’, “मी डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे तिथे प्रत्येक सण आणि महत्वाचे दिवस खूप छानपणे साजरे केले जातात, त्यातला एक दिवस म्हणजे प्रजासकता दिवस. मी अगदी लहान होती तेव्हा माझ्या बाबानी मला ध्वजारोहणाचं महत्व समजावलं होतं आणि ती गोष्ट माझ्यामनात नेहमीसाठी घर करून गेली. प्रजासकता दिवसाची शाळेत एकदम जय्यत तयारी असायची मी स्काऊट गाईडचा भाग होते. परेडच उत्साही वातावरण आणि त्यानंतर खाऊ मध्ये मिळणारे सामोसे आणि चॉकलेट मला आत्ता ही लक्षात आहे. माझे सासरे नौदलचा भाग होते ते आम्हाला एकदा नौसेनेची परेड बघायला घेऊन गेले होते. तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस आहे.

‘पारू’ ची सध्या सर्वत्र चर्चा होत आहेच तर जाणून घेऊया ‘शरयू सोनावणे‘, “अभ्यासाला सुट्टी आणि फक्त गणतंत्र दिवस साजरा करण्यासाठी शाळेत जायचं त्याचा आनंद वेगळाच असायचा. परेड व्हायची, प्रतिज्ञा म्हणायचो आणि मग सर्वाना छान-छान खाऊचे डब्बे मिळायचे. शाळेत माईकवर प्रतिज्ञा म्हणायची संधी नेहमी मलाच मिळायची कारण मी वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवायची. मला ध्वजारोहण कसा करतात पाहायला खूप आवडायचं. मी शब्दात व्यक्त नाही करू शकत अशा भावना आहेत. १० वी पर्यंत एमसीसी मध्ये होती तेव्हा नेहमी परेड मध्ये सहभागी व्हायची तेव्हा कळायचं की किती जबाबदारीच काम असत तेव्हा पासून जास्त जाणीव झाली की बॉर्डरवर जे सैनिक देशाची रक्षा करतात ते केवढं मोठं काम आहे. त्यांना माझा सॅल्यूट. खूप अभिमान वाटतो की मी भारताची नागरिक आहे. शेवटी हवाई दल,नौदल,फौजी, पोलीस सगळ्यांना सॅल्यूट आणि मनपूर्वक आभार तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत.”


‘सारं काही तिच्यासाठी’ ची निशी म्हणजेच दक्षता जोईल ,” २६ जानेवारीला माझ्या अभ्यासेतर उपक्रमची सुरवात झाली. मी छोट्या शिशूत होती तेव्हा माझ्या आई-बाबानी एक पानाचे भाषण तयार केले होते, आणि माझ्यानी ते पाठ होत नसल्याने मी रडायला लागले. पण माझ्या आई-वडिलांनी खूप हुशारीने माझ्याकडून ते भाषण तयार करून घेतले आणि शाळेत २६ जानेवारीच्या दिवशी मी ते भाषण सर्वांसमोर सादर केले आणि त्यादिवशी शाळेतला प्रत्येक शिक्षक आणि कार्यक्रम पाहायला आलेले व्यक्ती माझं कौतुक करत होते. या निमित्ताने भारताच्या नागरिकांना एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही एकामेकांची मन जपा वाद विवाद टाळा.”

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये