कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माझी- गोष्ट चिंधीची’ या मालिकेत हरबा करेल का बाळाचा स्वीकार?

कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माझी- गोष्ट चिंधीची’ या मालिका सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्रावर आधारित असून त्यांचा प्रवास या मालिकेत दाखवला जातो. आतापर्यंत चिंधीवर अनेक संकटं आली. चिंधीने प्रत्येक संकटावर मात केली. सध्या मालिकेत आपण पाहतो, दमडाजीने तिच्या पोटातील बाळाचा बाप तो असल्याचा आरोप केला आहे. यानंतर चिंधीचे आयुष्य खडतर होत जाते. दंदाजीच्या या आरोपामुळे चिंधीचं घरात चाल सुरु झाला आहे, तिला अन्न पाणी ही नाकारले जाते.
घरातून चिंधीची गोठ्यात रवानगी केली जाते. मात्र चिंधीला फक्त एकच आशा आहे तिचा नवरा हरबा तिला समजून घेईल. चिंधी हरबाला समजावण्याचा प्रयत्न करते, पण हरबाजी काहीही ऐकायला तयार होत नाही. चिंधी ह्या कठीण परिस्थितहि घर आणि गाव सोडून जात नाही म्हटल्यावर, दमडाजी चिंधीला गाव सोडायला सांगा किव्वा सपकाळ कुटुंबीय गाव सोडून जातील. असा फरमान काढतो. मोतीलाल हरबाजीचे कां भरतो आणि हरबाजी चिंधीला गावाबाहेर काढण्याचा निर्णय घेतो. चिंधीला आता प्रसूती वेदना सुरु होतात. ती हरबाजीला विनंती करते तिला आजच्या दिवस इथेच थांबू द्या म्हणून पण हरबाजी मात्र काही ऐकत नाही. चिंधीच्या वेदना वाढततात चिंधी गोठ्यात एक गोंडस मुलीला जन्म देते. आता हरबा या मुलीला स्वीकारेल का? हे पाहण्यासाठी नक्की बघा, सिंधुताई माझी माई, शनिवार, ३ फेब्रुवारी, संध्या. ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.