कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत सावित्री कवठेकरांची खरी वारसदार…

कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत अर्जुन सावीवर अनेक संकटं आली. प्रत्येक संकटाला त्यांनी तोंड दिले. सावीने नेहमीच प्रत्येक संकटात अर्जुनची साथ दिली आहे. अर्जुन कवठेकरांचा खरा वारस नाही त्यामुळे त्याला बेदखल केलं गेलं. ह्यात सावीने अर्जुनची साथ दिली. कवठेकरांचं वैभव सोडून तिने अर्जुनबरोबर लहानश्या घरात पण नवीन संसार थाटला. तरीही अर्जुनने सावीच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही कारण तिने आपली खरी ओळख लपवली आणि तिला अर्जुनच्या आयुष्यात वेगळ्या हेतूने आणला गेलं होतं. हे झाल्यावरही कवठेकरांचा वारस कोण? हा प्रश्न होताच.
हीच संधी साधून विद्याधरने याचा शोध घेण्यास सुरुवात केली. आता महाएपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल, कसा विद्याधर शारदाला सावीसमोर उभा करतो, त्यानंतर शारदाच्या प्रश्नांची उत्तर सावी देऊ शकेल का? आणि ज्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती ते रहस्य आता उलगडणार आहे. कवठेकरांचा खरा वारसदार समोर येणार, अग्निपरीक्षेला सामोरा जाणार अर्जुन-सावीचा संसार.
नक्की पहा, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’, महारविवार, ४ फेब्रुवारी, दु. १.०० वा. आणि संध्याकाळी ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.