आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

तेरणा दंतमहाविद्यालय आणि अस्थीदंत विभागाने आयोजित केलेला २७ वा इंडियन ऑर्थोडेंन्टीक सोसायटी पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या आयोजित केलेला दीक्षांत समारंभात अभिनेत्री सुधा चंद्रन ची उपस्थिती

विख्यात अभिनेत्री आणि भरतनाट्यम नर्तिका सुधा चंद्रन या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. तेलंगणा येथील आमदार डॉ. राजेश कुचकुला रेड्डी आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. इंडियन ऑर्थोपेडिक सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ. जयेश रहाळकर, डॉ. संजय लाभ, उपाध्यक्ष डॉ. एडिन्टन अरुमुगन, नामंनिर्देशित अध्यक्ष डॉ. पुनीत बागा यांच्यासह दीक्षांत समारंभाचे आयोजक डॉ. शैलेश शेणावा, सचिव डॉ. प्रकाश मुदलीयार, वैज्ञानिक निमंत्रक डॉ. रॉबिन मॅथ्यू अधिष्ठाता डॉ. शिशिर सिंह, दंत महाविद्यालय आणि तेरणा पब्लिक ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष पी. टी. देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रसंगी अमेरिकास्थित प्रोफेसर डॉ. रवींद्र नंदा, मंगरूलू येथील ए.बी. शेट्टी मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सचे डॉ. कृष्णा यांचे सत्कार करण्यात आले.

सदर भाषणात डॉक्टर शैलेश मित्र शैलेश शेणावा यांनी डॉक्टर रवींद्रनाथ डॉक्टर कृष्णा नायक आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल दीक्षांत समारंभ कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. जयेश रहाळकर, सचिव डॉ. संजय लाभ यांचेही त्यांनी कौतुक केले. चार दिवस चाललेल्या दीक्षांत समारंभात देशभरातून २२०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यावेळी स्पर्धात्मक आणि विनास्पर्धात्मक गटात पेपर, पोस्टर आणि वैज्ञानिक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या या कार्यक्रमात एम्ब्रांन्स २०२४ या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचाही समावेश होता. अस्थीदंत क्षेत्रातील तीस आयोजकांनी सहभाग घेतलेल्या ट्रेड फेअर प्रदर्शनाचे प्रतिनिधींनी कौतुक केले.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये