धर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित…
मुंबई, : – १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ह्या विदर्भातील जिल्ह्या पैकी एक असलेल्या गडचिरोलीतील लोकांचा लाडका नेता कसा बनला, ह्या जीवन संघर्षाची कहाणी यावेळी स्टेजवर अत्राम यांनी सांगितली. ते म्हणाले नक्षलवाद्यांनी मला 17 दिवस कसे ओलीस ठेवले होते. यात नवसंजीवनी मिळाली असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. यावेळी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी 1400 किलोमीटरचा प्रवास केला.
हा सन्मान मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला असल्याचे सांगितले. त्यांनी गडचिरोलीतील पाच हजार कुटुंबांना खाणकामात रोजगार उपलब्ध करून दिला असून भविष्यातही ते आपल्या गावातील लोकांच्या कल्याणासाठी व रोजगारासाठी कार्यरत राहणार आहेत. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात 16 व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. वैदेही तामन तर्फे आयोजित या कार्यक्रमात धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक कर्तृत्ववान यांचा गौरव करण्यात आला.ह्या महान नेत्याच्या चरित्रावरील “धर्मरावबाबा आत्राम – दिलो का राजा” हा चित्रपटही तयार झाला आहे, हे 17 दिवस नक्षलवाद्यांच्या तावडीत घालवणे त्यांना किती कठीण गेले असावे, या संपूर्ण प्रवासाचे चित्रण ह्या चित्रपटात करण्यात आले आहे.