इंडियाज बेस्ट डान्सरची चौथी आवृत्तीची ऑडिशन….
मुंबईच्या ऑडिशनमध्ये नव्या दमाच्या कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित असतील, प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत जे. पाठक, , सीझन 2 ची विजेता सौम्या कांबळे आणि सीझन 3 मधले स्पर्धक बूगी एलएलबी, शिवांशु सोनी, आणि विपुल कांडपाल.
मुंबईतील ऑडिशनविषयी पुनीत जे. पाठक म्हणतो, “मुंबई म्हणजे भारतीय मनोरंजनाचे स्पंदण पवणारे हृदय आहे, जेथे स्वप्नांना पंख फुटतात आणि तारे जन्माला येतात. आम्ही या शहरातील नवीन डान्स सेंसेशन शोधत आहोत, एक असे रत्न, जे मंचावर येऊन चमकण्यास सज्ज असेल. इंडियाज बेस्ट डान्सर हा तुमचा ध्यास सत्यात उतरविण्याची एक संधी आहे. ही संधी गमावू नका- 1 जून 2024 रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, अंधेरी येथे या तुमचे कसब आम्हाला दाखवा!”
एक माजी स्पर्धक आणि दुसऱ्या सीझनची विजेती सौम्या कांबळेने सांगितले की या मंचाने तिचे आयुष्य कसे पालटून टाकले. ती म्हणाली, “इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनच्या मुंबई ऑडिशनमध्ये सहभागी होणे स्वप्नवत वाटते आहे. 2021 मध्ये मी ऑडिशन दिली, तेव्हा मला कल्पनाच नव्हती की ही ऑडिशन म्हणजे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असेल! ही एक संधी होती, जी मी हस्तगत केली आणि त्यातून अमर्याद शक्यतांचे दरवाजे माझ्यासाठी खुले झाले. या शो ने मला माझी कला घासून-पुसून चमकवण्यात मला मदत केली, मला नवीन डान्स स्टाइल्स बारकाईने शिकवल्या, आणि त्यातूनच मी आज जी आहे ती डान्सर घडले. मुंबई ऑडिशनमध्ये नवीन उत्साही आणि होतकरू डान्स-वेड्यांना भेटण्यास मी उत्सुक आहे, ज्यांची स्वप्ने मोठी आहेत आणि डान्सच्या जगात ज्यांना मोठे नाव कमवायचे आहे. माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा!”
लिंक:- https://www.instagram.com/reel/C6yzV4tqMk6/?igsh=MW5obml2MWg0ZDM2cQ==
‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ लवकरच येत आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!