Serialताज्या घडामोडी

महाराष्ट्राचा महानायक परत येतोय; अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. “येतोय ‘महाराष्ट्राचा महानायक’ लवकरच”, असं म्हणत ‘कलर्स मराठी’ने मालिकेची पहिली झलक आऊट केली होती. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. आता मालिकेचा पहिला प्रोमो आऊट करत प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देण्यात आलं आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचा महानायक परत येतोय. नुकताच ‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा दिसत आहेत. तसेच ‘शिस्त म्हणजे शिस्त’ हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये ‘अशोक मा.मा.’ असं दिसत आहे. एकंदरीतच अशोक मामा आणि मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव सारखंच आहे.

‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. तसेच अशोक मामांसह आणखी कोणते कलाकार मालिकेत झळकणार? मालिका कधीपासून सुरू होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

‘अशोक मा.मा.’ मालिकेबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले,”मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. ‘टन टना टन’ या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल”.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये