आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
मुंबईत भेसळ युक्त आणि दुर्गंधी मिठाई विक्रीला …
कांदिवली पश्चिम येथील बंदरपाखाडी विभातील धर्मेश वरठे आणि त्यांची पत्नी श्रद्धा वरठे ह्या दिवाळी निमित्त बंदरपाखाडी मार्केट येथील ‘श्री देवनारायण स्वीट्स आणि फरसाण मार्ट’ ह्या दुकानात येथे मिठाई खरेदी करायला गेले असता त्यांना खराब झालेली गुलाबजामून ही मिठाई देण्यात आली. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन निमित्त मिठाई चे प्रसाद म्हणून नैवेद्य ठेवण्यात आले आले असता त्यातून दुर्गंधी आणि फेस आळेला दिसून आला.
त्याच क्षणी उपशाखाप्रमुख धर्मेश वरठे ह्यांनी शिवसेना शाखा क्र. २१ यथे उपविभागप्रमुख श्री. श्याम मोरे ह्यांच्याशी चर्चा केली व दुकानदारा विरोधात अन्न भेसळ नियंत्रण मंडळ येथे मिठाई तपासणीस पाठवून कायदेशीर कारवाईसाठी तक्रार केली आहे अशी माहिती वरठे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली .