शिल्पा शेट्टी कुंद्राचा बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा ट्रेलर येणार या दिवशी !
शिल्पा शेट्टी कुंद्राच्या आगामी चित्रपट “सुखी” चा बहुप्रतिक्षित ट्रेलर 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून शिल्पा चे चाहते या साठी उत्सुक आहेत. शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. तिच्या “सुखी” मधील अभिनयाने तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ट्रेलर रिलीजच्या बातमीने आता सगळ्यांना ट्रेलर ची उत्सुकता लागली आहे.
अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी कुंद्राची उत्क्रांती अफलातून आहे. तिच्या आगामी चित्रपट ” सुखी” साठी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली असून 6 सप्टेंबरला ट्रेलर रिलीझ होण्यासाठी सगळेच वाट बघत आहेत. चित्रपटाची कथा आणि पात्रांची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा वाढवत आहे. चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “सुखी” एक अत्यंत अपेक्षित सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला यांसारख्या अफलातून प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.
6 सप्टेंबर रोजी “सुखी” ट्रेलर रिलीज होणं हे शिल्पा साठी नक्कीच अभिमानास्पद आहे.
https://www.instagram.com/p/CwzHtgeIjXu/?igshid=MzRlODBiNWFlZA==