सान्या मल्होत्रा ते कियारा अडवाणी या बॉलीवूड अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट !
मल्टी स्टार चित्रपट असणाऱ्या या बॉलीवुड अभिनेत्री !
बॉलीवूड चित्रपट सृष्टी हा सतत विकसित होणारा उद्योग आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. आजच्या घडीच्या अभिनेत्री वेगळ्या विषयावर चित्रपट करण्यात , अष्टपैलू भूमिका स्वीकारण्यात आणि चित्रपटात एकमात्र फोकस करून जुना स्टिरियोटाइप च्या पलिकडे जाऊन काम करण्यावर भर देतात. सान्या मल्होत्रा ही बॉलीवुड मधली एक ट्रेलब्लाझिंग टॅलेंट आहे सोबतीला कियारा अडवाणी आणि क्रिती सॅनन यांसारख्या अभिनेत्रींच्या या श्रेणीत येतात. स्वतःच्या भूमिका उत्तम साकारून नेहमीच त्या मल्टी-स्टार चित्रपट करतात. या मल्टी स्टार अभिनेत्रीचा हा खास प्रवास ….
सान्या मल्होत्रा :
नेहमीच उत्तम चित्रपट करून आपल्या आकर्षक कामाने प्रेक्षकांची मन जिंकणारी म्हणून हीच नाव घेतलं जात. सान्या मल्होत्राने वेळोवेळी सिद्ध केले आहे की ती मल्टी-स्टारर चित्रपटांच्या आव्हानापासून मागे हटणारी नाही. भावनिकरित्या भरलेल्या स्पोर्ट्स ड्रामा दंगलपासून ते हृदयस्पर्शी कॉमेडी-नाटक बधाई हो आणि आणि हटके कॉमेडी लुडो पर्यंत सान्याने तिच्या मोहक कामगिरीने प्रेक्षकांवर अमिट छाप सोडली आहे. मल्टी-स्टारर प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त, फोटोग्राफ, पॅग्लाईट आणि कथल यांसारख्या चित्रपटांमध्ये सान्याचा परफॉर्मन्स ने सगळ्यांची मन जिंकली.
कियारा अडवाणी :
कियारा अडवाणी तिच्या हसऱ्या आणि करिष्माई स्वभासाठी ओळखली जाते. तिने अनेक मल्टी-स्टारर चित्रपट केले आणि स्वतःचा ठसा उमटवला आहे. विनोदी चित्रपट गुड न्यूज, ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडी भूल भुलैया 2 आणि हिट कौटुंबिक सिनेमा जुग्जुग जीयो यासारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाने सिद्ध केले आहे की ती नेहमीच दर्जेदार काम करू शकते.
क्रिती सॅनन :
तिच्या प्रभावी अभिनय चॉप्ससह क्रिती सॅननने मल्टी-स्टारर चित्रपटांमध्ये स्वत: ची जादू दाखवली आहे. स्टार-स्टडेड अॅक्शन-कॉमेडी दिलवालेपासून ते हाऊसफुल्ल 4 पर्यंत तिने इतर प्रतिभावान स्टार्ससोबत चमकण्याची तिची क्षमता सातत्याने दाखवली आहे.
सान्या मल्होत्रासाठी दिग्गज शाहरुख खानने प्रसिद्ध केलेला जवान हा तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे, ज्यात दीपिका पदुकोण, नयनतारा आणि प्रियामणी यासारख्या अभिनेत्री झळकणार आहेत. जवानाशिवाय तिच्याकडे विकी कौशलसोबत सॅम बहादूर हा बहुचर्चित चित्रपट आहे.