लाईन मारतोय थेट मराठी वीडियो अल्बम आयटम सॉंग चे प्रकाशन..

ट्रिपल वन स्टार जे सी पठाण मुव्हीज च्या बेनरखाली निर्माता पठाण जिलानीपाशा चाँदपाशा यांनी लाइन मारतोय थेट या मराठी वीडियो अल्बम आयटम सॉंग ची निर्मिती केली असून नुकतेच मालाड येथील दि मॉल च्या द डेजर्ट लाउन्ज येथे मोठ्या थाटामाटात प्रकाशित करण्यात आला. या मराठी अल्बम आयटम सॉंगमध्ये भोजपुरी नायिका व आयटम गर्ल अनारा गुप्ता व पठाण जिलानीपाशा ही जोडी चमकणार आहे. या लाईन मारतोय थेट वीडियो अल्बम चे नृत्य आणि दिग्दर्शन दिलीप मिस्त्री यांनी केले असून वसंत पवार यांच्या गीताला संगीत साज चढवला आहे सागर सपकाळे यांनी तर हे गाणे गायले आहे शकुंतला जाधव आणि सुमित सावंत यांनी तर छायांकन केले आहे सेबस्टियन अँथोनी यांनी आणि संकलन केले आहे .
मो. अख्तर यांनी हा लाईन मारतोय थेट मराठी वीडियो आयटम सॉंग बी फोर यू म्युजिक यूट्यूबवर १५ सप्टेंबर ला रिलीज झाला आहे. पठाण जिलानीपाशा यांना खात्री आहे की हा अल्बम आजच्या तरुण पिढीला नक्कीच आवडेल. अनारा गुप्ता जरी भोजपुरी सिनेमात स्टार असली तरी मराठी चित्रपट करण्याची तिची इच्छा आहे व त्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाउल आहे असे ती सांगते.
या अल्बमचे गीतकार वसंत पवार हे पोलीस खात्यात सहाय्यक निरीक्षक म्हणून गेली दहा वर्षांपासून रुजू आहेत. त्यांनी शौक म्हणून अनेक गीतरचना केलेल्या आहेत. त्यांचा हा दुसरा अल्बम होय.