Bollywood NewsEntertainment

बॉलीवूडचा प्रथितयश गायक सोनू निगम एक अनोखे खुमासदार गीत घेऊन येत आहे, प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपटातील हे गीत आहे..

सोनू निगम चे खाणे आणि गाणे जाणून घेऊया 'वडापाव ' च्या निमित्ताने

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. प्रसाद दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘वडापाव’ असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ चित्रपटात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी ‘वडापाव’ चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत,प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल,सनिस खाकुरेल हे आहेत. या चित्रपटाचे लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तसंच,चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे आहे.संगीतकार कुणाल करण ‘वडापाव’ या आगामी चित्रपटाचे संगीतकार आहेत तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. तेव्हा तयार रहा घमघमीत वडापावची झणझणीत चव अनुभवायला.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये