EntertainmentSerial

अशोक शिंदेनी स्विकारला स्वदेशी बाणा !…

‘सारं काही तिच्यासाठी’ हि गोष्ट आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. उमाचा नवरा रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. २० वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले.

पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे “सारं काही तिच्यासाठी”.

. सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेबद्दल काय सांगाल?

ह्या मालिकेची कथा खूप दमदार आहे. या मालिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ही कथा दोन बहिणींची, पती-पत्नीच्या प्रेमाची आणि ते एकमेकांना कसे समजून घेतात याची. ही गोष्ट आहे संपूर्ण कुटुंबाची आणि तत्वांची. आमच्या ह्या मालिकेचं एक वैशिष्ट म्हणजे या मालिकेत खलनायक, खलनायिका असं कोणीच नाहीये. या मालिकेत प्रत्येकजण खूप मेहनत घेत आहे आणि आपले सर्वोत्तम देत आहे. हे प्रेक्षकांना देखील मालिकेत दिसून येईल. या मालिकेचे शीर्षकगीत आणि संगीतही अप्रतिम आहे.

आज पर्यंत मी अनेक दूरदर्शन आणि वाहिन्यांवरती काम केलीझी मराठी शी माझा नातं अल्फा गौरव पांसून आहेमला माझा पहिला अभिनय पुरस्कार मिळाला तो अल्फा गौरव मध्येआता पुन्हा झी मराठीने मला हे सुंदर पात्र साकारण्यासाठी आणि झी मराठीचा एक भाग होण्याची संधी दिली आहेही एकंदरीत एक छान भावना आहेमला ही अप्रतिम मालिका दिल्याबद्दल मी झी मराठीचा आभारी आहे.

. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?

मी रघुनाथ खोत ही भूमिका साकारत आहे. रघुनाथने अगदी लहान वयातच वडील गमावले. तेव्हापासून त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. लहान वयातच कुटुंबाची एवढी मोठी जबाबदारी घेतल्याने तो जबाबदार आणि परिपक्व झाला. तो अतिशय शिस्तप्रिय आणि सभ्य स्वभावाचा एक सज्जन व्यक्ती आहे.आपण प्रोमो मध्ये रघुनाथ ला पहिला असेल, तो दिसायला खूप गंभीर आणि बायकोला आपल्या बहिणीला भेटू देत नाही असं वाटते, किंवा बायको त्याला घाबरते असं दिसतं. पण रघुनाथच्या आयुष्यात असा एक ट्विस्ट येतो जिथे त्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, ‘सारं काही तिच्यासाठी’ चा संपूर्ण अर्थ तिथेच आहे. रघुनाथ हा कर्तव्यनिष्ठ आणि एकदम सच्चा माणूस आहे व आपल्या बायकोवर अतिशय प्रेम करणारा आहे. इतक्या वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर मला ही वेगळी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे. मी त्याबद्दल मी खरोखरच आनंदी आहे.

३. जेव्हा तुम्हाला ह्या मालिकेबद्दल विचारलं तेव्हा तुमची काय भूमिका होती? 

— झी ने मला जवळजवळ ८ वर्षांनंतर पुनरागमन करण्याची ही अप्रतिम संधी दिली आहे, त्यामुळे मी खूपच आनंदी आहे.

४. तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल काय सांगाल आता पर्यंतचा प्रवास कसा राहीला?

माझ्या अभिनय कारकिर्दीत मी खूप काळ काम केले आहे, जवळ जवळ १७० सिनेमात नायक खलनायक म्हणून काम केले आहे. माझी ही झी मराठी वरची मालिका आहे ती १०६ वी मालिका आहे. आज पर्यंत मी अनेक दूरदर्शन आणि वाहिन्यांवरती काम केली. झी मराठी शी माझा नातं अल्फा गौरव पांसून आहे. मला माझा पहिला अभिनय पुरस्कार मिळाला तो अल्फा गौरव मध्ये. आता पुन्हा झी मराठीने मला हे सुंदर पात्र साकारण्यासाठी आणि झी मराठीचा एक भाग होण्याची संधी दिली आहे. ही एकंदरीत एक छान भावना आहे. मला ही अप्रतिम मालिका दिल्याबद्दल मी झी मराठीचा आभारी आहे.

 

 

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये