रॉकस्टार डीएसपीच्या संगीताने घेतली कांगुवा चित्रपटा मध्ये खास जागा !
कांगुवा " मध्ये दिसणार रॉकस्टार डीएसपीचे हार्ट-थंपिंग बीजीएम ची झलक !
सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते शिवाच्या आगामी तमिळ चित्रपट कांगुवाची अपेक्षीत झलक शेवटी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सुपरस्टार सुरियाच्या 48 व्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोठ्या उत्साहात याची पहिली झलक प्रेक्षकांना देण्यात आली. या पहिल्या वहिल्या झलक मधून स्पाइन-चिलिंग व्हिज्युअल आणि ज्यामध्ये सुरियाचा समावेश आहे सोबतीला हार्ड-हिटिंग BGM ज्याची रचना रॉकस्टार डीएसपीने केली आहे. सोशल मीडियावर कांगुवाची झलक दिसल्यानंतर DSP च्या अनोख्या संगीताची स्तुती देखील पाहायला मिळाली आणि याची सोशल मीडिया वर चर्चा सुरू झाली.
https://www.youtube.com/watch?v=oBlxdr1KbEA
संगीताच्या उस्तादां ची मैफिल सोबतीला पीरियड अॅक्शनरची पहिली झलक बहु-हायफनेटेड अरुणराजा कामराजच्या खास गाण्याच्या ओळी यातून अनुभवयाला मिळतात. कांगुवा 2024 च्या सुरुवातीला 10 भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर येणार असल्याच समजतंय. टीझर लाँच झाल्यापासून काही वेळातच इंटरनेटवर याची तुफान चर्चा सुरू झाली.
रॉकस्टार डीएसपी सध्या यूएसए मधील त्याच्या Oo अंतावा टूर मध्ये व्यस्त असून नुकताच सॅन जोस मधला यशस्वी शो करून हा दौरा 29 जुलै रोजी शिकागो येथे भव्य फिनालेसह संपन्न होणार आहे. कांगुवा व्यतिरिक्त तो अनेक उत्तमोत्तम चित्रपट करणार असल्याचं समजतं ज्यामध्ये बहुप्रतिक्षित पुष्पा 2 देखील येणार आहे.