EntertainmentMovieताज्या घडामोडी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आदिती पोहनकर अभिनीत ‘पाहिले मी तुला’चे पोस्टर प्रदर्शित…

मुंबई / विजय कांबळे

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अदिती पोहनकर आणि भूषण पाटील अभिनीत ‘पाहिले मी तुला’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं आहे. हा चित्रपट ४ ऑगस्ट २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रतिभावान अभिनेत्री अदिती पोहनकर ‘पाहिले मी तुला’ या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे.

कौटुंबिक नाट्य असलेल्या या चित्रपटात आयुष आणि अलिशा यांच्या भूमिकेतील भूषण आणि अदिती यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. त्यांचं प्रेम फुलणार की त्यात अडचणी येणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.
कॅप्टन आॅफ द शिप म्हणजेच या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले मनोज कोटियान ‘पाहिले मी तुला’बाबत म्हणाले की, आपापल्या दैनंदिन जीवनात व्यग्र असलेल्या लोकांना प्रेमाच्या माध्यमातून रिफ्रेश करणारा हा चित्रपट आहे. या कथेद्वारे अशा लोकांना काही क्षणांसाठी का होईना आनंदी करायचं आहे.
मुख्य भूमिकेतील अदिती पोहनकर म्हणाली की, मी या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहे. नाटयमय वळणांची हि खूप गोड, इन्टेन्स लव्ह स्टोरी आहे. जेव्हा मला या स्टोरीचं नॅरेशन देण्यात आलं तेव्हा मी इतकी मोहित झाले की कथेच्या शेवटी काय घडतं ते जाणून घेण्यास उत्सुक झाले. मला खात्री आहे की प्रेक्षकही चित्रपट पाहिल्यानंतर आकर्षित होतील. मी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.
चित्रपटाची कथा सारंग पवार आणि सुशील पाटील यांची आहे. पटकथा आणि संवादलेखन अभय अरुण इनामदार यांनी केलं आहे. मनोज कोटियान दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती निर्माते सुशील पाटील, निलेश लोणकर, अरविंद राजपूत यांनी एनएसके श्री फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली केली असून, सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट प्रस्तुतकर्ते आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांचे पिकल एन्टरटेन्मेंट अँड मीडिया प्रा. लि. या चित्रपटाचे वितरक आहेत.
या चित्रपटात भूषण पाटील, अदिती पोहनकर, उदय टिकेकर, अतुल तोडणकर, सुहास परांजपे, माधव अभ्यंकर, शुभांगी लाटकर, सुहास परांजपे आणि अमृता पवार यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ४ ऑगस्ट २०२३ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये