Entertainmentताज्या घडामोडीफिल्मी दुनियामहाराष्ट्र

सन मराठी वरील ‘कन्यादान’ मालिकेत निर्मिती सावंत आत्याच्या भूमिकेत….

मुंबई / विजय कांबळे

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. कन्यादान ही त्यापैकीच एक मालिका.

कन्यादान ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे हे कलाकार ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. आता या मालिकेतील महाले कुटुंबात वंदू आत्याची एंट्री होणार आहे. विनोदाची महाराणी अशी ओळख असणारी अभिनेत्री निर्मिती सावंत ‘वंदू आत्या’ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. महाले कुटुंबातील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असणारी आत्या ‘चांगल्या सोबत चांगली, आणि वाईट असणाऱ्या सोबत तेवढीचं वाईट’ अशा स्वभावाची आहे. मात्र, आशालता आणि तिच्या तीनही मुलांसाठी आत्या ही नावडती व्यक्ती आहे. महाले कुटुंबातील सर्व रहस्य आणि आशालाताच्या कारस्थानी युक्त्यांविषयी वंदू आत्याला सगळं माहित आहे. त्यामुळे, आशालतावरही आत्याचा कायम दबाव राहिला असून, आशालाताने आपल्या तीनही मुलांना नेहमीच आत्याविषयी वाईट सांगून त्यांना तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता अनेक वर्षानंतर आत्या महालेंच्या घरी येणारं आहे. त्यावेळी तिच्या स्वभावातील विविध पैलू महाले कुटुंबियांना अनुभवयाला मिळणार आहेत. शिवाय, आजवर ज्या आशालतामुळे या तीनही मुलांना आत्याविषयी राग आहे त्यांनाही आत्याच्या स्वभावातील प्रेमळपणाची जाणीव होणार आहे. अनेक वर्षांनंतर महालेंच्या घरी येणारी वंदू आत्या, आता तिच्या स्वभावातील सकारात्मकता आणि प्रेम त्यांच्यापर्यत कसं पोहोचवणार हे पाहायला मजा येणार हे मात्र नक्की.

महालेंच्या घरातील गुपितं फोडण्यासाठी येणारी वंदू आत्या भरपूर मजा-मस्ती, आनंद आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा परिपूर्ण खजिना घेऊन येणार आहे.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.

सोमवार ते शनिवार रात्री ८.३०वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे…..

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये