EntertainmentMovieताज्या घडामोडी

अमोल टीव्ही ओटीटीवर ‘लव्हस्टोरी आहे ही’ हा म्युझिक व्हिडिओ लाँच…

मुंबई / विजय कांबळे

अमोल टीव्ही ओटीटीवर ‘लव्हस्टोरी आहे ही मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात संजय पारेकर, सचिन पारेकर यांच्या अमोल अमोल प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेचं विशेष महत्त्व आहे. नाटक, टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्मिती, वितरणाच्या क्षेत्रात या संस्थेनं स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे. त्याशिवाय त्यांनी अमोल टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. अमोल टीव्ही या प्लॅटफॉर्मवर ‘लव्हस्टोरी आहे ही’ हा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.

चित्रकला मोशन पिक्चर्स आणि अमोल प्रॉडक्शन्सनं “लव्हस्टोरी आहे ही” हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. निस्सी जस्टिन आणि राहुल सूर्यवंशी यांनी या म्युझिक व्हिडिओचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर राहुल सूर्यवंशी यांनी गीतलेखन केलं आहे. चैतन्य देवढे (माऊली) आणि प्रिया चिंचोलकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रमोद साखरे आणि आर्या घारे यांच्यावर हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. याचं दिग्दर्शन अजगर अली यांनी केलेलं असुन प्रशांत जाधवर यांनी सहायक दिग्दर्शन केलेलं आहे. उत्तम संगीत, सहजसोपे आणि गोष्ट उलगडणारे शब्द यांचा मिलाफ या म्युझिक व्हिडिओमध्ये झाला आहे. त्यामुळे हा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांची पसंती मिळवेल यात शंका नाही.

संजय पारेकर, सचिन पारेकर यांच्या संकल्पनेतून अमोल टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली आहे. पारेकर यांनी निर्मिती केलेल्या शेजारी, शेजारी, लपंडाव , क्षण , प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत , असे अनेक चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्याशिवाय ८०हून अधिक चित्रपटांचे वितरण अमोल प्रॉडक्शन्सने राज्यभरात केलं आहे. त्यामुळेच अमोल टीव्ही ओटीटीवर उत्तमोत्तम चित्रपट, म्युझिक व्हिडिओचा खजिना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये