सनी लिओनी ब्युटी लाइन मिंत्रा ( Myntra ) सोबत करणार काम ..
सनी लिओनी या एका फॅशन प्लॅटफॉर्मवर झळकणार ...
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि उद्योजिका असलेल्या सनी लिओनीने फॅशन आणि जीवनशैलीसाठी भारतातील आघाडीचे ऑनलाइन डेस्टिनेशन असलेल्या Myntra सोबत एक खास गोष्ट केली आहे तिच्या या भागीदारी ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामुळे तिचा सुप्रसिद्ध कॉस्मेटिक्स ब्रँड, “Starstruck With Sunny Leone”. ब्रँड आता सगळ्यांच्या भेटीला Myntra वर आला. लिपस्टिक, लिप लाइनर, आयलाइनर, मस्करा, हायलाइटर्स आणि नेल पॉलिशसह विविध उत्पादनांचा या ब्रँड मध्ये समावेश आहे.
2018 मध्ये लाँच झालेल्या सनी लिओनीच्या स्टारस्ट्रकने अभिनेत्रीचे चाहते आणि सौंदर्यप्रेमी ना भुरळ घातली आहे. ब्रँडची पोहोच भारता सोबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत विस्तारली आहे.
याबद्दल सनी म्हणते ” मी मिंत्रासोबतच्या आमच्या सहकार्याबद्दल खूप रोमांचित आहे! ही भागीदारी ‘स्टारस्ट्रक विथ सनी लिओन’ भारतभरातील माझ्या अतुलनीय चाहत्यांना आणि सौंदर्यप्रेमींसाठी आणखी सुलभ बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. Myntra च्या प्लॅटफॉर्मवर माझा ब्रँड भरभराट होताना बघून खूप आनंद होतोय”
अभिनय आणि व्यवसाय असा दुहेरी प्रवास ती अगदी सहजतेने सांभाळत आहे.