शाहरुख खानच्या ‘जवान’ साठी रिताभारी ने लिहिले खास डायलॉग !
रिताभरी चक्रवर्तीच ते स्वप्न झालं साकार !
तिच्या उल्लेखनीय अभिनया साठी ती ओळखली तर जाते पण रिताभरी ने चक्क ब्लॉकबस्टर ” जवान ” साठी डायलॉग लिहिण्यात मदत देखील केली आहे. जवान चा प्रोमो रिलीज झाला आणि रिताभरीने शाहरुख खानसाठी “जवान” मधील संवाद तयार करण्यात आणि विचारमंथन करण्याची भूमिका चोखपणे बजावली हे तितकच खर आहे. एका Instagram पोस्टमध्ये, प्रसिद्ध लेखक सुमित अरोरा ज्यांनी “जवान” साठी संवाद देखील लिहिले आहेत त्यांनी रिताभरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जे संवाद जगाला “द बाप” वाटले आहेत.
चक्रवर्तीने तिच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं प्रोमोसाठी शाहरुख खानशिवाय इतर कोणासाठीही संवाद लिहिण्यात मदत केल्याबद्दल ती कृतज्ञ आणि धन्य आहे आणि हे तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे. स्टारने ते त्याच्याशी शेअर केल्यानंतर लगेचच फोनवर त्याचे कौतुक केले. तिने तिच्या पोस्टमध्ये एक मजेदार अंतर्दृष्टी देखील शेअर केली आहे, “FYI @iamsrk यांना वाटते की सुमित सबका बाप ने बोल दिया पेक्षा रिताभरी हे लेखकासाठी एक चांगले नाव आहे!”
https://www.instagram.com/p/CxIDwKFh508/?hl=en
अष्टपैलू अभिनेत्री तिच्या आगामी “टाईम” शीर्षकाच्या संगीत व्हिडिओसाठी तयारी करत आहे जो या शुक्रवारी रिलीज होणार आहे.