Bollywood NewsEntertainment

कैटरीना कैफने ठरली UNIQLO ची पहिली भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर …

https://www.instagram.com/reel/CxpHeNINUgH/?igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री म्हणून तर कतरिना कैफ प्रसिद्धीच्या शिखरावर आहेच आता अजून एक नवी झेप घेऊन ती एका मोठ्या ब्रँड चा चेहरा ठरली आहे. पहिली भारतीय महिला म्हणून ती या ब्रँड चा चेहरा ठरली. तिने पुन्हा एकदा एक महत्त्वाची वाटचाल केली आहे ज्याने फॅशन आणि मनोरंजनाच्या जगामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे. तिला जपानी जागतिक फॅशन दिग्गज UNIQLO ची पहिली भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून लाँच करण्यात आल असून संपूर्ण भारतीयासाठी ही कौतुकाची बाब ठरली आहे. जागतिक मंचावर भारतीय प्रतिनिधित्वाच्या इतिहासातील हि बाब नक्कीच अभिमानास्पद ठरली. 

UNIQLO ची नवनियुक्त ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कतरिना कैफ आपली अनोखी छाप पाडणार आहे. या असोसिएशनबद्दल विचारले असताना कैटरीना म्हणते ” मी UNIQLO सोबतच्या माझ्या भागीदारीबद्दल खूप उत्सुक आहे. मला जपानी संस्कृती आणि त्यांच्या रचना सौंदर्यशास्त्राबद्दल नेहमीच आकर्षण होत आणि UNIQLO हा माझ्या जीवनावश्यक वस्तूंचा ब्रँड आहे जो कमालीचा आहे. 

कैटरीना कैफचा चेहरा हा जागतिक आयकॉनचा दर्जा UNIQLO च्या धोरणात्मक निर्णयावर प्रकाश टाकतो, भारताच्या विस्तारत्या फॅशन मार्केटचा आणि तरुण लोकसंख्येचा फायदा घेतो जे तिच्या शैली आणि सेवाभावी प्रयत्नांची प्रशंसा करतात. UNIQLO च्या अॅम्बेसेडरच्या भूमिकेसोबतच कतरिना इतिहाद एअरवेजची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही काम करते.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये