आनंद एल रायच्या कलर यलो प्रॉडक्शन्सने अंश दुग्गल सारख्या फ्रेश टॅलेंट ला केलं लाँच …
W
आनंद एल राय कलर यलो प्रॉडक्शनमागील एक भक्कम चेहरा आहेत आणि नुकतंच त्यांनी एक नवा चेहरा लाँच केला आहे. कलर यलो ने अभिनेता अंश दुग्गलची ओळख इंडस्ट्री ला करून दिली आहे. जो भारतीय चित्रपट उद्योगातील एक रोमांचक चेहरा आहे. आनंद एल राय ज्यांनी नेहमीच नव्या कलाकारांना प्रोत्साहन देत असतं आणि त्यांनी अंशची चित्रपट जगताशी ओळख करून दिली आहे. अंश दुग्गल कलर यलो प्रॉडक्शनसह अनेक क्रिएटिव्ह प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
आनंद एल राय म्हणतात ” आम्ही नेहमीच नव्या कलाकारांना प्रोत्साहन देत असतो आणि अशातच अंश ला लाँच करून त्याला आम्ही आमच्या नव्या प्रोजेक्ट मध्ये एक नवीन ओळख देणार आहोत. ”
अंश दुग्गल सारखा नवा चेहरा लाँच करून चित्रपटांसाठी एक नवीन कलाकार घेऊन येणं हे अगदीच कौतुकास्पद आहे. ही घोषणा कलर यलो प्रॉडक्शन ने केली असून नेहमीच नव्या टॅलेंट ला संधी देण्याची अनोखी संधी आहे.
आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन भारतीय सिनेमाच्या लँडस्केपमध्ये चर्चेत आहे. शुभ मंगल सावधान, तनु वेड्स मनू, रांझणा यांसारख्या चित्रपट त्यांनी केले असून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट येणाऱ्या काळात रिलीज होणार आहेत.
आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनचे अनेक प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये असताना ” तेरे इश्क मे, फिर आयी हसीन दिलरुबा, झिम्मा २, आत्मपॅम्फलेट ” हे उत्कंठावर्धक प्रोजेक्ट येणार आहेत.