अभिनेता टायगर श्रॉफ चा सिनेमॅटिक प्रवास
हीट फ्लॉप सोबत सुपरहिट ठरलेला टायगर श्रॉफ !

टायगर श्रॉफने आजवर भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपट केले आणि या उद्योगातील सर्वात विश्वासार्ह सुपरस्टार म्हणून आपले स्थान निर्माण केलं. प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरवून त्याने आजवर अनेक उत्तम चित्रपट केले. एक डायनॅमिक परफॉर्मर , एक अफलातून डान्सर आणि अॅक्शन हिरो अशी त्याची अष्टपैलुत्व ओळख कायम चर्चेत असते.
हिरोपंती या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करून नव्या कलाकारांच्या यादीत येऊन टायगर ने ७२.६ कोटी चा गल्ला गोळा केला. त्याच्या बागी चित्रपटाची फ्रँचायझी हा कायम ब्लॉकबस्टर ठरला ज्याने बॉक्स ऑफिस वर 524 कोटी कमावले. दर्जेदार अॅक्शन सीक्वेन्ससह आणि टायगरच्या प्रभावी मार्शल आर्ट कौशल्याने प्रेक्षकांना कायम भुरळ घातली आहे. बॉक्स ऑफिस वर हीट ठरलेल्या वॉर ने 475 कोटी कमावले. हृतिक आणि टायगर ची कमाल केमिस्ट्री यातून प्रेक्षकांनी अनुभवली.
टायगर च्या तथाकथित सरासरी चित्रपटांनी त्याच्या निर्मात्यांची कमाई कायम केली यात शंका नाही. आजवर टायगर च्या प्रत्येक सिनेमाने बॉक्स ऑफिस वर उत्तम कमाई केली यात स्टुडंट ऑफ द इयर 2 (98.6 कोटी) मुन्ना मायकल (47.20 कोटी) ए फ्लाइंग जट (56.13 कोटी) या चित्रपटाचा समावेश होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याकडे फक्त दोन फ्लॉप्स असून टाइगर च फॅन्स फॉलोइंग हे कायम आहे.
गणपथ नंतर टायगर त्याच्या आगामी चित्रपटांसह प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज असून अक्षय कुमार सोबत “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये अभिनय करत आहे. वॉर हा त्याचा जबरदस्त चित्रपट ठरणार असून त्याचे जगन शक्ती, रॅम्बो दिग्दर्शित “हीरो नंबर 1” या सोलो प्रोजेक्टबद्दल बोललं जातंय. सिद्धार्थ आनंद निर्मित टायगरने अलीकडेच हैदराबादमध्ये रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन’ साठी काही नेत्रदीपक अँक्शन स्टंट केले आहेत. टायगर हा आता नव्या प्रोजेक्ट च्या सोबतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.