Entertainmentआरोग्य व शिक्षण

निरोगी राहण्याचे मंत्र- झोप, पौस्टिक आहार आणि व्यायाम : ऐश्वर्या नारकर

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ह्या मालिकेत ऐश्वर्या नारकर ह्या ‘रुपाली राज्याध्यक्ष’ ची भूमिका साकारतात आहे. त्या कामामध्ये व्यस्त असूनही फिटनेस व निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात ह्या बाबतीत त्यांनी नुस्के सांगितले आहेत. ऐश्वर्या नारकर ह्या गेल्या वीस वर्षा पासून जिम व वेट ट्रेनिंग करत आहे.

नुकतंच त्यांनी योग सराव करायला सुरवात केली आहे. त्यांच्या सुंदर त्वचेचे व दाट केसांचे रहस्य व्यायाम आणि शुद्ध आहारच आहे. ह्या फिटनेस जीवनशैलीला घेऊन त्यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, ” माझा दिवस सकाळी ५:३० वाजता सुरु होतो आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून त्या नंतर रोज अंदाजे ३० – ४० मिनिटं योग करते ज्याच्याने मला स्पुर्ती व मनाची शांती मिळते. योग मी माझ्या पुतणी कडून शिकते आहे जी एक योग प्रशिक्षक आहे. व्यायाम करण्या सोबत मी पौस्टिक आहार घेते. गव्हाचे आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळते व माझा सगळा आहार शुद्ध तुपामध्ये बनतो. भात हा पदार्थ माझ्या आहारात लहानपणापासून आहे व सगळ्यांना माझं येव्हडच म्हणणं असेल की तुमच्या लहानपणीच्या खाण्याच्या सवयी मोडू नका. आपल्या आयुष्यात समतोल आणि सातत्य ठेवले कि आपलं आरोग्य निरोगी राहत. माझ्यासाठी निरोगी राहण्याचे मंत्र म्हणजे झोप, पौष्टीक आहार आणि व्यायामच आहे.”

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये