Entertainment

आला सण दिवाळीचा ! आठवणीतली दिवाळी

फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी, फराळाचा घमघमाट,आकर्षक देखण्या रांगोळ्या, सुंदर तेवत्या पणत्यांची आरास, घरोघरी सुंदर आकाश कंदिल सुरु झाला आहे सण दिवाळीचा. आठवण अशी गोष्ट आहे, जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात आनंदचे पाणी विशेषतः जेव्हा ती आठवण सणासुधीची असते. दिवाळीचा सण म्हटलं की लहानपणीच्या इतक्या आठवणी जाग्या होतात. पहाटे अभ्यंग स्नान, आईनी लावलेल्या उटण्याचा सुगंध, बाबां सोबत फटाके वाजवणे, चविष्ट फराळचा भावंडांबरोबर बसून आस्वाद घेणे. अश्या गोष्टी बहुतेकांच्या आठवणींच्या पेटीत नक्की असतील आणि अश्याच आठवणींनचा पेटारा आज तुमचे झी मराठीचे लाडके कलाकार तुमच्या समोर उघडत आहेत.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ची अक्षरा म्हणजेच शिवानी रंगोळे, ‘माझ्यासाठी दिवाळीची आठवण म्हणजे माझ्या तीन मावश्या आणि आम्ही सर्व भावंडं एकत्र येऊन फराळ बनवायचो ह्या गोष्टी मी फार मिस करते. ह्या वर्षी कामात खूप गुंतलेली आहे पण सुट्टी मिळाली तर मी आणि विराजास पुण्याला जाऊ माझ सासर आणि माहेर दोन्ही पुण्यातच आहे. सर्व कुटुंबासोबत दिवाळी साजरी करू आणि सुट्टी नाही मिळाली तर मुंबईतच मित्र मंडळींना घरी फराळासाठी बोलवींन आणि फराळ करत करत गप्पा गोष्टी करू. मला फक्त दिवाळीची नाही तर भाऊबिजेची पण उत्सुकता असते कारण तो एक दिवस आहे जेव्हा आम्ही सगळे भावंडं जे आता कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात राहतात ह्या दिवशी आम्ही विडिओ कॉलमध्ये एकत्र येतो आणि एकामेकांच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे ह्या बद्दल बोलतो. एकूण काय तर मी दिवाळीत परिवार आणि मित्र मंडळी सोबत साजरी करते.

ऋषिकेश शेलार म्हणजेच अधिपतीच्या भूमिकेतून लोकांच्या मनात घर केले आहे त्यांनी दिवाळी बद्दल बोलताना सांगितले की दिवाळी म्हणजे शाळेच्या सुट्टीत रायगड, राजगड आणि अश्या इतर काही किल्ल्यांवर सहलीला जायचो आणि तिथे फराळ करायचो फक्त परिवारातील नाही तर कॉलनी मधले सगळे ह्या सहली मध्ये सामील असायचो पण आता शूटिंगमुळे हे सर्व शक्य नाही. मला लक्ष्यात आहे, २०१७ ची दिवाळी मी कुटुंबासोबत अमेरिकेत होतो आणि आम्ही न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर मध्ये बसून फराळ खाल्ला होता आणि मग ब्रॉडवेत नाटक पहिले होते. ह्या वर्षी माझी दिवाळी मुंबई मध्ये साजरी होणार आहे. ह्या दिवाळीत आई बाबा घरी येणार आहेत माझ्या मुलीची पहिली दिवाळी आहे रुही १० महिन्याची आहे आणि तिच्यामुळे आमची सर्वांची दिवाळी खास झाली आहे.
पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, रूहीचं पाऊल घरात पडले आणि माझे आयुष्य बदलून गेलं. मला झी मराठीची मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये पहिल्यांदा नायकाची भूमिका साकार करायला मिळाली. मला कडक चकल्या आवडतात आणि माझी आई माझ्यासाठी खास त्या बनवते.
मला सख्खी बहीण नाही पण माझ्या मावस बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी सारख्या आहेत. भाऊबीजेच्या दिवशी आमच्या कडे मटणाचा बेत असतो आणि ते ठरलेले आहे आम्ही सर्वे झणझणीत मटणावर ताव मारतो.

‘सारं काही तिच्यासाठीची’ उमा म्हणजेच खुशबू तावडे ‘माझी जवळची आणि अविस्मरणीय दिवाळीची आठवण माझ्या मुलाचा म्हणजे राघवचा जन्म धनत्रयोदशी दिवशी २०२१ मध्ये झाला. ती माझ्यासाठी सगळ्यात सुंदर भेट होती. ह्या वर्षी ही खूप उत्साह आहे माझी नवीन मालिका सुरु आहे, मी एक वर्किंग आई आहे गेल्या वर्षी दिवाळीत राघव लहान होता म्हणून फराळ करायला वेळ नाही मिळाला पण ह्या वर्षी त्याला कळायला लागले आहे तर मी त्याच्या करता त्याला आवडणारे पदार्थ बनवले आहे. त्याला लाडू, शंकरपाळ्या आवडतात. माझ्या या मालिकेमुळे माझा एक नवीन परिवार तयार झाला आहे तो म्हणजे माझे चाहते, त्यांनी माझी ही दिवाळी खास बनवली आहे. आमच्याकडे लक्ष्मीपूजन फक्त घरी नाही तर आमच्या दुकानात ही होतं तर ती एक वेगळी मज्जा असते.
भाऊबीज म्हणजे भावंडंच गेट टूगेदर त्या दिवशी भाऊजी आणि वाहिन्यांना नो एन्ट्री असते.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडे ‘माझी ही दिवाळी खूप खास आहे कारण मी आणि माझी बहीण खुशबू तावडे आम्ही डोंबिवली मध्ये दिवाळी पहाट साजरी करणार आहोत. जिथे आम्ही लहानपणी मित्र परिवारासोबत जायचो तिथे ह्या दिवाळी मध्ये मी आणि खुशबू खास पाहुणे म्हणून जाणार आहोत. माझे आई- बाबा ही तिथे असणार आहेत ही दिवाळी माझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे. लहानपणी मी, ताई, आई आणि बाबा रात्री उशिरापर्यंत बसून एकत्र फराळ बनवायचो खूप मज्जा यायची मी धाकटी आणि सर्वात लाडकी असल्यामुळे मला करंजीला आकार देणे, चकल्या पाडणे ह्या गोष्टीं करायला मिळायच्या. दिवाळी नंतर भाऊबीजची ही खूप उत्सुकता असते करण मी आणि खुशबू रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्ही साजरा करतो आम्ही लहानपणा पासून ती रीत ठेवली आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही सर्व भावंडं भेटतो आणि भाऊबीज साजरी करतो.

ही दिवाळी सर्वांसाठी आनंदाची आणि सुख समृद्धीची जावो अशीच प्रार्थना आहे.

रोहित परशुराम (अर्जुन,अप्पी आमची कलेक्टर) दिवाळी ह्या सणा बद्दल भावना व्यक्त करतांना सांगितले, ” ही दिवाळी आमच्या पूर्ण परिवारसाठी खासच आहे कारण माझ्या घरी खरोखरच लक्ष्मीचे आगमन झाले आहे. माझी लाडकी लेक रुई. तिच्या येण्याने आमचे घर आनंदाने भरून गेले आहे. तिच्या गोड हसण्याने आम्ही सर्वच जणू फुलून जातो. ह्या वेळी पूर्ण दिवाळ सण माझ्या लाडक्या कन्येच्या अवतीभवती असणार आहे. सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. “

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये