व्हिजनरी फिल्ममेकर शेखर कपूर यांनी सिंगापूरमधील एका प्रतिष्ठित कार्यक्रमाला लावली हजेरी

प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हलमध्ये 10 नोव्हेंबर रोजी 1880 ड्रीम कॅचर्स इव्हेंटम ला खास हजेरी लावली. प्रसिद्ध बँकर पियुष गुप्ता यांच्यासमवेत त्यांचे “रिबेलियन अँड क्रिएटिव्हिटी इन मिथ मेकिंग” हे खास सत्र इकडे पार पडलं.
नाविन्यपूर्ण आर्थिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमाने प्रगती दाखवून आणि AI ची वित्त क्षेत्रातील नवीन कामगिरी अश्या अनेक विषयावर चर्चा इथे झाली. या महोत्सवात उद्योजक आणि AI नवोदितांच्या भेटी गाठी झाल्या AI च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर चर्चा नावीन्यपूर्ण विचारांना एकत्र घेऊन येण्यासाठी शेखर कपूर यांनी अनेकांना मार्गदर्शन दिलं.
शेखर कपूर हे बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आपल्या नाविन्यपूर्ण कामासाठी नेहमीच चर्चेत असतात आणि म्हणून शेखर कपूरने आपले ज्ञान आणि अनुभव शेयर केले. दिग्दर्शकाने चित्रपटाच्या दिग्दर्शकाविषयी देखील आपले मत मांडले या बद्दल ज्ञान व्यक्त केले ” मी माझ्या लेखन कारकिर्दीपासून दूर गेलो आणि आत्म-शोधाचा प्रवास सुरू केला. माझा विश्वास आहे की जोपर्यंत आपण शोधत राहू तोपर्यंत आपण खरोखर जिवंत आहोत. “
शेखर कपूर यांचा प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवास आहे “एलिझाबेथ,” “मिस्टर इंडिया,” “बँडिट क्वीन,” आणि “मासूम” सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी शेअर केलेल्या महत्त्वाच्या कल्पनांचा कॅनव्हास आहे. कपूर यांचा सिनेमॅटिक मिथक मेकिंगची प्रगल्भ पकड प्रेक्षकांना केवळ प्रेरितच नाही तर त्यांना प्रोत्साहन देते. सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट “मासूम… द न्यू जनरेशन” मध्ये मग्न असून लवकरच हा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.