Bollywood NewsEntertainment

“श्री देवी प्रसन्न” नंतर सई पुन्हा एकदा नव्या नेटफ्लिक्स रिलीज साठी सज्ज !

“श्री देवी प्रसन्न” च्या रिलीज नंतर सई पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसते आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स वरच्या ” भक्षक ” मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई “जस्मीत गौर” या एका पोलिस अधिकाऱ्याची ची भूमिका साकारणार आहे. भूमी पेडणेकर , सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका यात दिसणार आहे. सई ने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे आणि आता हा नवा रोल सई कसा साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

भक्षकमध्ये भूमी सई ताम्हणकर एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार तर आहेच पण पुन्हा एकदा बॉलिवुड मधल्या बड्या कलाकारां सोबत ती ओटीटी वर दिसणार आहे.

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.भक्षक च्या ट्रेलर ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि आता 9 फेब्रुवारी ला भक्षक नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे.

सई पहिल्यांदा रेड चिली एंटरटेनमेंट सोबत हा खास प्रोजेक्ट करणार आहे आणि यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. वर्षभरात सई नेहमीच वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. जस्मीत गौर ला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

शेअर करा

Ultimate Mediaz / Vijay Kamble

This is news and update of coverage media site. Entertainment, Fashion, Business, Sports, and Politics and Social News. E-mail: ultimatemediaznews@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये