सनी लिओनी “पेट्टा रॅप” डान्स नंबरसाठी प्रभुदेवासोबत करणार काम
सनी लिओनी तिच्या फूट टॅपिंग चार्ट साठी प्रसिद्ध आहे आणि ती आणखी एका आकर्षक डान्स मधून प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. यावेळी ती आगामी डान्स नंबर “पेट्टा रॅप” मध्ये डान्स आयकॉन प्रभुदेवासोबत झळकणार आहे. नुकताच निर्माते आणि अभिनेत्रीने चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करून याची घोषणा केली आहे.
सनीला या नव्या प्रोजेक्ट बद्दल बोलताना म्हणते “आम्ही हा फास्ट बीट नंबर थायलंडमध्ये शूट केला आहे. मी प्रभुदेवा सरांची खूप मोठी चाहती आहे. त्याच्या कामातील नाविन्यपूर्ण पद्धत आणि इलेक्ट्रिक डान्स मूव्ह्ससाठी ओळखले जातात आणि त्याच्याशी माझ्या स्टेप्स जुळवण्याचा मी प्रयत्न करत होते.” सनीने दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात प्रवेश केल्याने तिच्या कारकिर्दीतील हा क्षण खास आहे.
दिग्गज डान्स आयकॉन सनीच्या जोडीला आणि ही जोडी यावेळी रोमांचक डान्स नंबरसह स्टेजवर काय घेऊन येणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.