Serial
सूर्याच्या साक्षीने झालेलं लग्न विशेषतः आबांनी स्वीकारावे, ही रमा राघवची इच्छा अखेर पुर्ण झाली

अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरे जात एकमेकांची साथ अधिक घट्ट करत केवळ सूर्याच्या साक्षीने झालेलं लग्न घरच्यांनी विशेषतः आबांनी स्वीकारावे.ही रमा राघवची इच्छा अखेर पुर्ण झाली आहे.
आबांनी हे नाते स्वीकारले असून एक पाऊल पुढे जात त्यांनी वडीलधाऱ्यांच्या साक्षीने या दोघांचा लग्नसोहळा अतिशय थाटामाटात करण्याचे ठरवले आहे.
हा लग्नसप्ताह सोम ११ मार्च ते रवि १७ मार्चपर्यंत संपन्न होणार असून या साग्रसंगीत मराठमोळ्या लग्नसोहळ्यातील मानाचा विधी म्हणजेच चुडा भरण्याचा कार्यक्रम, जो १२ मार्च आणि १३ मार्चला होणार आहे.
या भव्य लग्नाची तयारी सध्या जोरदार आणि जल्लोषात सुरु असून हा दिमाखदार लग्नसोहळा सोहळा प्रेक्षकांना रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘रमाराघव’