Entertainmentताज्या घडामोडीफिल्मी दुनिया
सोनू निगमचे ‘सर्किट’ मधील रोमँटिक गाणं रसिकांच्या भेटीला…
मुंबई / विजय कांबळे
अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे यांचं “सर्किट” या चित्रपटातलं रोमँटिक गाणं नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. “काहीसा बावरतो, काहीसा सावरतो….” असे हलकेफुलके शब्द असलेलं हे गाणं सोनू निगम यांनी गायलं असून, वैभव आणि हृता यांची छान केमिस्ट्री या गाण्यात पहायला मिळते आहे. आजवर अनेक कारणांनी चर्चेत असलेला “सर्किट” हा चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
